Bank Loan: नोकरी असली तरी पण या व्यक्तींना कर्ज मिळणार नाही, चेक करा काय आहे याच्या मागचे कारण

Bank Loan Eligibility: आपण घर घेण्यासाठी कार घेण्यासाठी तसेच विविध अन्य कारणांसाठी कर्ज काढत असतो व त्यासाठी बँक आपल्याला आपल्या क्रेडिट स्कोर अनुसार व्याजदर ठरवून कर्ज देत असते परंतु कधीकधी आपल्याला चांगली नोकरी असते तरी पण आपल्याला कर्ज देण्यास बँक नकार देते. आपण वारंवार बँकेमध्ये एप्लीकेशन पाठवले तरी पण बँक आपले लोन reject करते.

चांगली नोकरी असताना पण आपल्याला का कर्ज मिळत नाही असा प्रश्न तुमच्या मनात उद्भवू शकतो व त्यामुळे आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला जर कर्ज मिळवायचे असेल तर काय महत्त्वाचे निकष आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

लोन न मिळण्याची कारणे Bank Loan Eligibility

आपल्याला बँकेमधून लोन न मिळण्याची विविध कारणे असू शकतात ज्यामध्ये आपण लोन ची अमाऊंट साठी अर्ज दाखल करत आहोत ते आपल्या उत्पन्न श्रेणी पेक्षा खूपच जास्त असेल तर आपले कर्ज नाकारले जाते तसेच जर आपण यापूर्वी कर्ज घेतलेले असेल आणि जर आपण संबंधित करता हप्ता पडलेला नसेल तरी देखील आपले लोन नाकारले जाऊ शकते. परंतु या व्यतिरिक्त देखील विविध कारणांमुळे तुमचे लोन रिजेक्ट होऊ शकते यामध्ये तुमच्या लोन फॉर्म मधील चुका, वाईट सिबिल स्कोर, अपुरी दस्तावेज यांचा समावेश होतो.

नोकरी चा लोन मिळण्यास रोल

जर तुम्ही यापूर्वी कर्ज घेतलेले असेल आणि जर तुम्ही परत दुसऱ्या कर्जासाठी बँकेमध्ये इन्क्वायरी केली तर तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो व तुमचे कर्ज नाकारले जाऊ शकते तसेच जर तुम्ही यापूर्वी तुमच्या नोकरीच्या आधारे मोठे लोन घेतलेले असेल आणि तुम्ही जर परत लोन साठी अप्लाय केले असेल तर देखील तुमचे लोन नाकारले जाते.

समजा तुम्ही मोठे लोन घेतले आहे व त्याचा कर्जाचा हप्ता नियमितपणे भरत नसाल तसेच तुम्ही एका नोकरीमधून दुसऱ्या नोकरीमध्ये वारंवार स्विच होत असेल तर तुमचा लोनचा इतिहास बघता पण तुम्हाला कर्ज देण्यास नकार देऊ शकते व कर्जाचे हप्ते नियमित न भरल्यामुळे तुम्हाला पेनल्टी पण लागू शकते. (Credit Score Tips: एका झटक्यात लोन मिळवण्यासाठी या टिप्स तुम्हाला मदत करतील! वाढेल चांगला क्रेडिट स्कोर)

खराब क्रेडिट स्कोर असणे

तुम्हाला किती कर्ज द्यायचे आणि तुम्हाला कर्ज देण्यामध्ये किती जोखीम आहे याचा अभ्यास करण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर ठरवला जातो. सामान्यतः जर तुमचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकते व जर तुमचा क्रेडिट स्कोर 400 पेक्षा कमी झालेला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यामध्ये विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

हे पण बघा: Pik vima: तुम्हाला पिक विमा मिळाला नाही का? मग तुम्ही करा असा अर्ज

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा