15 एप्रिल नंतर कॉल फॉरवर्डिंग बंद होणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश, लगेच बदला मोबाईल सेटिंग

भारतामध्ये सध्या विविध प्रकारच्या स्कॅम ने जोर धरलेला आहे परंतु यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात होणारे स्कॅम म्हणजे मोबाईल वरून पेमेंट गेटवे चे स्कॅम आणि यावरती उपाय म्हणून ओटीपी सुविधा तसेच इतर सिक्युरिटी प्रोटोकॉल लावण्यात आलेले आहेत.

परंतु प्रत्येक गोष्टीसाठी हे स्कॅमर लोक नवनवीन जुगाड लावत आहेत आणि ओटीपी सिस्टीम बायपास करण्यासाठी त्यांच्याकडून कॉल फॉरवर्डिंग चा जुगाड लावण्यात येत आहे ज्यामध्ये नागरिकांचे फोन कॉल अन्या नंबर वरती डायव्हर्ट करून त्याद्वारे फसवणुकीचे प्रकार होत आहेत.

आता या सर्व गोष्टींना आळा फसवण्यासाठी भारत सरकारच्या मार्फत टेलिकॉम कंपन्यांना 15 एप्रिल नंतर तात्पुरत्या स्वरूपामध्ये कॉल फॉरवर्डिंग सुविधा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि त्यानुसार टेलिकॉम कंपन्यांकडून पावली उचलले जात आहेत.

USSD-based कॉल फॉरवर्डिंग ची सुविधा पुढील सरकारचा आदेश येईपर्यंत बंद राहील अशी माहिती कंपन्यांच्या प्रतिनिधी मार्फत देण्यात येत आहे. संबंधित सुविधा ही कायमस्वरूपी बंद केले जाणार नाही परंतु तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित केली जाणार आहे.

कॉल फॉरवर्डिंग म्हणजे काय (Call forwarding)

कॉल फॉरवर्डिंग मध्ये आपण आपल्या सिम कार्ड वर येणारे फोन कॉल तसेच मेसेज आणि दुसऱ्या नंबर वरती पाठवू शकतो कधीकधी आपल्या मोबाईल ला रेंज राहत नाही आणि अशा वेळेस आपल्याला आपल्या फोनवरती येणारे महत्त्वाचे संदेश तसेच कॉल स्वीकारता यावेत यासाठी कॉल फॉरवर्डिंगचा विकल्प देण्यात आलेला आहे ज्यामध्ये सर्व कॉल आणि मेसेज नवीन नंबर वरती पाठवले जातात

स्कॅमर कसे फसवतात

फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून नागरिकांना फोन कॉल केला जातो आणि त्यांना सांगितले जाते की आम्ही सिम कार्ड कंपनी मधून बोलत आहोत आणि तुमच्या सिम कार्ड ला प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये तुमची सुविधा बंद केली जाऊ शकते आणि सुविधा चालू ठेवायची असेल तर आम्ही सांगितलेला कोड मोबाईल मध्ये टाका बहुतेक हा कोड *401# असतो आणि त्यापुढे आपल्याला एक त्यांनी सांगितलेला फोन नंबर टाकायला लावतात

जेव्हा आपण हा कोड मोबाईल मध्ये टाकतो तेव्हा आपल्या मोबाईलवर येणारे सगळे मेसेज आणि फोन कॉल नवीन नंबर वरती पाठवले जातात आणि अशा पद्धतीने ते आपले बँकेचे मेसेज ओटीपी वाचून फसवणूक करत असतात.

आता नागरिकांच्या सुविधासाठी असा कोड टाकून कॉल फॉरवर्डिंग करण्याचा ऑप्शन बंद करण्यात येणार आहे परंतु जर तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग करणे अत्यंत गरजेचे असेल तर तुम्ही मोबाईलच्या सेटिंग्स च माध्यमातून ही सुविधा वापरू शकता.

हे पण वाचा:

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा