Credit Score Tips: एका झटक्यात लोन मिळवण्यासाठी या टिप्स तुम्हाला मदत करतील! वाढेल चांगला क्रेडिट स्कोर

Credit Score Increase Tips: भारतामध्ये कोणत्याही वित्तीय संस्थानाकडून किंवा बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर सर्वात पहिला तुमचा क्रेडिट स्कोर तपासला जातो. जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला संबंधित बँकेकडून कर्ज नाकारले जाते किंवा तुम्हाला अधिक व्याजदर देऊन कर्ज घ्यावे लागू शकते.

आपण गृह कर्ज, कार लोन किंवा शैक्षणिक कर्ज घेऊ शकतो आणि असे कर्ज घेत असताना आपला क्रेडिट स्कोर जर 750 पेक्षा जास्त असेल तरच आपल्याला चांगल्या व्याजदरामध्ये कर्ज मिळेल जर आपला क्रेडिट स्कोर 500 पेक्षा कमी झालेला असेल तर आपल्याला कर्ज मिळण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागेल.

क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी टिप्स, Credit Score Tips

जर तुमचा क्रेडिट स्कोर कमी झालेला असेल तर तो कशाप्रकारे वाढवता येईल जेणेकरून तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये सहज पद्धतीने लोन उपलब्ध होईल याविषयीची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. आपला क्रेडिट स्कोर उत्तम पद्धतीने वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी मदत करत असतात याबद्दल माहिती जाणून घेऊया.

हे पण वाचा: Pik vima: तुम्हाला पिक विमा मिळाला नाही का? मग तुम्ही करा असा अर्ज

तुम्हाला गरज असेल तितकेच कर्ज घ्या

तुम्हाला जितके पैशांची गरज असेल तितकेच कर्ज तुम्ही बँकेकडून घेतले पाहिजे आणि त्याची वेळेत परतफेड केली पाहिजे जर तुम्ही अतिरिक्त कर्ज घेऊन ठेवले आणि त्याची वेळेत परतफेड केली नाही तर तुम्हाला पुढच्या वेळेस कर्ज मिळताना अडचणी येतील आणि जर तुम्ही जास्त काळासाठी कर्ज घेऊन ठेवलेले असेल तर तुम्हाला अतिरिक्त दुसरे कर्ज मिळण्यास खूप प्रॉब्लेम येतील.

क्रेडिट कार्ड चे ऑटो डेबिट मोड

आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतात ज्यांचा ते उपयोग करत असतात परंतु या क्रेडिट कार्डचे मॅनेजमेंट करत असताना कधी कधी आपण काही क्रेडिट कार्ड चे पेमेंट करायला विसरतो ज्यामुळे आपल्याला पेनल्टी तर मिळू शकते त्याचबरोबर आपला क्रेडिट स्कोर देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही एकापेक्षा जास्त खेळत कार्ड वापरत असाल तर त्यामध्ये ऑटो डेबिट मोड ऑन करून ठेवा जेणेकरून मासिक हप्त्याच्या वेळेस पैसे ऑटोमॅटिक कट होतील आणि क्रेडिट स्कोर मेंटेन राहील.

हे बघा: Bank Loan: नोकरी असली तरी पण या व्यक्तींना कर्ज मिळणार नाही, चेक करा काय आहे याच्या मागचे कारण

आपल्या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा

जेव्हा आपण क्रेडिट कार्ड घेतो तेव्हा त्यामधील केलेल्या पेमेंट चे बिलिंग करताना आपल्या खात्यामध्ये बँकेने नमूद केलेला मिनिमम बॅलन्स असणे गरजेचे आहे जर आपल्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवलेला नसेल तर आपले क्रेडिट स्कोर वाढेल आणि आपल्याला पेनल्टी शुल्क देखील लावले जाईल त्यामुळे आपल्या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा.

क्रेडिट यूट्यूलाईझेशन रेशो

क्रेडिट युटीलायझेशन रेशो म्हणजे आपल्याला जे क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत त्यामधील किती रक्कम आपण खर्च शकतो. क्रेडिट युटीलायझेशन रेशो 30 टक्के पेक्षा कमी असेल तर आपल्याला क्रेडिट स्कोर वाढणे मध्ये मदत होते जर तुमचा क्रेडिट युटीलायझेशन रेशो 30 टक्के पेक्षा जास्त वाढलेला असेल तर तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर वरती वाईट परिणाम बघायला मिळेल.

याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा हप्ता भरावा लागत असेल तर आपल्याकडे आपत्कालीन पैसे असणे गरजेचे असते कधीकधी आपले पैसे कुठेतरी अडकलेले असतात किंवा आपण काही कारणाने बँकेचा हप्ता भरू शकत नाही त्यामुळे आपल्याला बँकेकडून नोटीस येते आणि आपला क्रेडिट स्कोर देखील कमी होतो जर तुम्ही कोणतेही कर्ज थकीत केले तर तुम्हाला परत कर्ज मिळणार नाही किंवा कर्ज मिळाले तर जास्त व्याज द्यावे लागेल.

तुम्हाला हे पण वाचायला आवडेल: स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पैसे नाही का? सरकारच्या या 4 योजनांमधून मिळवा लाखो रुपयांचे कर्ज

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा