ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘ड्रोन दीदी योजना’ , ड्रोन उडवण्याच्या प्रशिक्षणासह मासिक पगार

Namo Drone Didi Yojana: काही दिवसांपूर्वी बिल गेट्स आणि नरेंद्र मोदी यांच्या मध्ये चर्चा झाली ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी भारतातील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयीची माहिती बिल गेट्स यांना सांगितली. याचबरोबर देशातील तंत्रज्ञानामधील प्रगतीचा फायदा देशातील नागरिकांना कशाप्रकारे होत आहे याविषयीची माहिती त्यांनी दिली.

यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो ड्रोन दीदी योजना विषयीची माहिती दिली यामध्ये त्यांनी सांगितले की संबंधित योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल तसेच ड्रोन दीदी मधून त्यांना लखपती दीदी बनवण्याची उद्दिष्ट आहे

भारतातील वाढत्या तंत्रज्ञानाचा प्रभाव ग्रामीण भागातील महिलांवर त देखील व्हावा आणि त्यांना संबंधित तंत्रज्ञानामधून काहीतरी रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने ग्रामीण भागातील महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यासाठी त्यांना योग्य मानधन देखील प्रदान केले जाईल.

ड्रोन दीदी योजना | Drone Didi Yojana

संपूर्ण देश पातळीवरती नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यात येणार आहे आणि यामध्ये जवळपास तीन कोटी ग्रामीण भागातील महिलांना ड्रोन दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच महिलांनी फक्त चूल आणि मूल मध्ये गुंतून न राहता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना रोजगार प्राप्त व्हावा हेच ड्रोन दीदी योजनेचे उद्दिष्ट आहे.

नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण करणे तसेच ड्रोन ची निगा राखणे याविषयीचे प्रशिक्षण दिले जाईल. शेतीविषयक कामांसाठी ड्रोन चा उपयोग कसा करायचा याचेही प्रशिक्षण मिळेल याच्यामध्ये ड्रोन च्य माध्यमातून बियाणे पेरणी, कीटकनाशक फवारणी, तसेच पिकांच्या निरीक्षणाची जबाबदारी ड्रोन दीदी वरती असेल.

दहा ते पंधरा गावं मिळून एक ड्रोन दीदी ची नेमणूक केली जाते आणि संबंधित महिलेला पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देखील दिले जाते सर्व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना 15000 रुपये मासिक पगार दिला जाईल आणि हा पगार डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट खात्यावर जमा होईल.

भारतातील कोणतीही महिला या योजनेमध्ये सहभागी होऊ शकते याची मुख्य अट म्हणजे महिलेचे वय हे 18 ते 37 वर्ष असावे तसेच संबंधित महिला भारताची नागरिक असावी आणि महिला कोणत्याही स्वयंसेवी संघटनेची निगडित सक्रिय सदस्य असावी.

ड्रोन दीदी योजनेसाठी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ईमेल ऍड्रेस
  • स्वयंसेवी संस्थेचे ओळखपत्र

आजच्या लेखांमध्ये आपण ड्रोन दीदी योजना विषयी माहिती जाणून घेतली. केंद्र सरकारच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी ड्रोन दीदी योजना एक चांगली भूमिका पार पाडेल तसेच देशातील नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागापर्यंत व्हावा यासाठी ही योजना कार्य करेल.

हे पण वाचा:

महिलांना मिळणार 5 लाख रुपयांचे कर्ज तेही 0 टक्के व्याज दरात, महिलांसाठी सरकारची कामाची योजना

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा