रेशन दुकानांमध्ये कापडी पिशव्या मिळणार! तुम्हाला मिळाली का ही पिशवी

शासनाकडून विविध स्तरातील व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात आणि रेशन कार्ड च्या मदतीने विविध वस्तूंच्या वाटप होत असते आधी अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या रेशन कार्डधारकांना साडी वाटप करण्यात आले होते आणि आता रेशन घेण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

वर्षभरात दोन वेळा संबंधित कापडी पिशव्यांचे वाटप केले जाईल. याविषयी संबंधित रेशन दुकानांना निर्देश देण्यात आलेले आहेत आणि काही ठिकाणी पिशव्यांचे वाटप करण्यात आलेले आहेत तर काही ठिकाणी अजून वाटप सुरू झालेले नाही परंतु पुढील काही दिवसांमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला देखील या कापडी पिशव्या मिळू शकतील.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुमचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल तर तुम्ही स्वतःच्या रेशन कार्ड काढण्यासाठी मोबाईल वरूनच ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करू शकता ज्यामुळे तुमचे तहसील कार्यालयाकडे चकरा मारणे वाचेल. (हे वाचा: विहीर खोदण्यासाठी सरकारकडून 2.5 लाख रुपयांचे अनुदान, असा करावा लागेल अर्ज )

रेशन कार्ड मध्ये घरबसल्या नाव कसे नोंदवायचे

  1. सर्वात प्रथम महाफूडच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा – https://rcms.mahafood.gov.in/
  2. संबंधित वेबसाईट वरती गेल्यानंतर तुमच्यापुढे वरच्या बाजूला sign in / register चा पर्याय मिळेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे
  3. आता तुमच्यापुढे पब्लिक लॉगिन नावाचा पर्याय येईल ज्या वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल
  4. नवीन पानावर Registered user आणि New User असे दोन विकल्प तुम्हाला दिसतील त्यामध्ये तुम्हाला न्यू यूजर या विकल्प वरती क्लिक करायचे आहे
  5. नवीन पानावर तुम्हाला I want to register for new ration card चा पर्याय दिसेल वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक फॉर्म ओपन होईल जो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे आणि तिथे लॉगिन आयडी नावाचा पर्याय विचारेल या ठिकाणी तुम्ही योग्य लॉगिन आयडी टाकून चेक अवलेबिलिटी विकल्पावरती क्लिक करायचे आहे आणि जर लॉगिन आयडी उपलब्ध असेल तर तो तुम्हाला देण्यात येईल
  6. सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी टाकावा आता तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळालेला आहे.
  7. तुम्ही परत महाफुड च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता

जर तुमच्याकडे अंतोदय रेशन कार्ड असेल तर तुम्हाला साडी आणि कापडी पिशव्यांचा लाभ मिळू शकतो.

ही कामाची माहिती पण वाचा:

सोलर योजनेचा अर्ज मंजूर झालाय का, असे चेक करा

लग्न करण्यासाठी सरकार देत आहे 25 हजार रुपये, अनुदानात झालीय वाढ

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा