घरकुल योजना 2023 यादी महाराष्ट्र: घरकुल योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे ज्या मार्फत महाराष्ट्रातील बेघर असलेल्या कुटुंबीयांना स्वतःचे घर बनवण्यासाठी आर्थिक मदत केली जाते ही योजना महाराष्ट्रात अनेक व्यक्तींना स्वतःचे घर देण्यास मदत करत आहे.
प्रत्येक गावासाठी सरकारमार्फत घरकुल यादी जाहीर केली जाते आणि जर तुमचे नाव संबंधित यादीमध्ये असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळेल आणि जेव्हा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळतो तेव्हा तुम्हाला एक लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम विविध टप्प्यांमध्ये दिले जाते.
महत्त्वाचे मुद्दे:
- शासनामार्फत प्रत्येक गावासाठी घरकुल यादी जाहीर केली जाते
- संबंधित यादी चेक करण्यासाठी तुम्ही https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx या संकेतस्थळाची मदत करू शकता
- शासकीय वेबसाईट वरती गावानुसार लाभार्थ्यांची घरकुल यादी जाहीर केली जाते
- कोणताही व्यक्ती शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपल्या विभागासाठी ची घरकुल यादी डाऊनलोड करू शकतो
घरकुल योजना 2023 यादी महाराष्ट्र
मागील वर्षी ज्या व्यक्तींनी घरकुल योजनेसाठी अर्ज दाखल केला होता त्यांची यादी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आलेले आहे आणि तुम्हाला जर तुमचे नाव त्या यादीत आहे की नाही चेक करायचे असेल तर तुम्ही पुढे दिलेली प्रोसेस अवलंबावा:
- सर्वप्रथम तुम्ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जा त्याची लिंक आहे – https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx
- तुमच्याकडे घरकुल यादी चेक करण्यासाठीची एक वेबसाईट ओपन झालेले आहे ज्यामध्ये तुम्हाला A,B,C,D,E,F,G,H असे ब्लॉक दिसतील
- तुम्हाला F ब्लॉक पर्यंत जायचे आहे आणि Beneficiares registered, account frozen and verified या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. संबंधित पर्याय F ब्लॉक मध्ये तीन नंबरला आहे
- तुमच्यापुढे एक फिल्टर ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला पहिले दोन पर्याय तसेच ठेवायचे आहे आणि तिसऱ्या पर्याय वर क्लिक केल्यानंतर आपले राज्य निवडायचे आहे
- राज्य निवडल्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडावी लागेल
- संबंधित माहिती व्यवस्थितपणे भरल्यानंतर तुमच्यापुढे एक कॅपच्या येईल जो सोडवल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला खाली घरकुल योजनेची यादी बघायला मिळेल.
हे पण वाचा: सोलर योजनेचा अर्ज मंजूर झालाय का असे चेक करा
घरकुल योजनेमध्ये नाव कसे नोंदवायचे
जर तुम्हाला घरकुल योजनेमध्ये स्वतःचे नाव नोंदवायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करत असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून यासाठी अर्ज दाखल करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धती पुढीलप्रमाणे आहे.
- सर्वात प्रथम पीएम आवास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जा – https://pmaymis.gov.in/
- Citizen assessment या पर्याय अंतर्गत apply online बटनावरती क्लिक करा
- आता परत तुमच्याकडे विविध पर्याय ओपन होतील त्यामध्ये पहिला पर्याय ISSR हा सिलेक्ट करा तुमच्याकडे त्यानंतर नवीन पेज ओपन होईल
- तुमचे आधार कार्ड क्रमांक आणि नाव वेरिफिकेशन साठी विचारले जाईल संबंधित माहिती व्यवस्थित भरल्यानंतर check बटन दाबा
- आता नवीन फॉर्म ओपन होईल ज्या वरती Format A लिहिलेले असेल
- संबंधित फॉरमॅटमधील सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचून भरावी आणि शेवटी सबमिट बटनावरती क्लिक करून घरकुल योजनेसाठी ऑनलाईन आवेदन पाठवावे
सारांश
आजच्या या लेखामध्ये आपण घरकुल योजना 2023 यादी महाराष्ट्र याविषयीची माहिती जाणून घेतली तर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती संपर्क साधू शकता आणि जर तुम्हाला हा लेख आवडलेला असेल तर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप च्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकता जेणेकरून तुम्हाला प्रत्येक योजनेची माहिती वेळोवेळी अचूकपणे प्राप्त होईल.
हे पण वाचा:
- पी एम किसान योजना लाभार्थी यादी मराठी चेक करा, बघा तुमचे नाव आहे की नाही
- पोस्ट ऑफिस दाम दुप्पट योजना, आताच असा अर्ज करून लाभ मिळवा
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सूची 2024, तुमचे नाव आहे का चेक करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा