महाराष्ट्र शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून नागरिकांच्या हितासाठी विविध योजना राबवण्यात येत असतात आणि सध्या नागरिकांना होत असलेली सर्वात मोठी अडचण म्हणजे लाईटची अडचण आणि या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारकडून पीएम सूर्य घर योजना योजना राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाकडून सोलर योजनेसाठी महावितरणाच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात येत होते आणि आता सेंटरलाईज पोर्टल वरती आपण संबंधित योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतो. आपण आपल्या घरच्यानुसार सोलर पॅनल आपल्या घरावरती लावू शकतो आणि सरकारकडून लाभ प्राप्त करून घेऊ शकतो.
महत्वाचे मुद्दे:
- घरावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून अधिकतम 78 हजार रुपयांचे अनुदान
- नागरिकांना मोफत वीज प्राप्त व्हावी हा योजनेचा उद्देश
- देशभरात एक करोड घरांवरती सोलर पॅनल बसवण्याचे उद्दिष्ट
- नागरिकांना 300 युनिट मोफत वीज प्राप्त होईल
सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 78 हजार रुपये
काही दिवसांपूर्वी सरकार कडून पीएम सुर्यघर योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेत लाभार्थ्यांना सोलर पॅनल चा लाभ घेण्यासाठी अनुदान रक्कम जाहीर करण्यात आली. संबंधित योजनेत किलोवॉट च्या स्वरूपात रक्कम प्रदान केली जाते ज्यात कमीत कमी रक्कम ही 30 हजार रुपये आणि अधिकतम 78 हजार रुपये रक्कम दिली जाते.
13 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत संबंधित योजनेची घोषणा करण्यात आली आणि या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. देशभरात शंभर करोड कुटुंबांना याचा लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
सोलर पॅनल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- लाईट बिल (मागील सहा महिन्यातील कोणतीही चालेल)
- मोबाईल नंबर
- उत्पन्न प्रमाणपत्र
जर तुम्हाला देखील सोलर पॅनल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे वरती दिलेले कागदपत्रे असणे आवश्यक आहे कारण संबंधित कागदपत्रे हे अर्ज भरताना आवश्यक असतील.
सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्ज कसा करायचा
जर तुम्हाला देखील सोलर पॅनल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पीएम सूर्यघर योजना अंतर्गत संबंधित योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट – pmsuryaghar.gov.in वरती जावे लागेल.
वेबसाईटच्या होमपेज वरती तुम्हाला Apply For Rooftop Solar चा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडेल जागृती तुम्हाला राज्य जिल्हा तसेच इतर माहिती टाकावी लागेल याच बरोबर तुमच्या लाईट बिल वरील ग्राहक क्रमांक पण टाकावे लागेल.
संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावरती क्लिक करायचे आहे आणि नंतर तुमचा अर्ज सबमिट केला जाईल. तुमच्या सोलर योजनेविषयीच्या विविध अपडेट तुम्हाला मोबाईल वरती एसएमएस च्या स्वरूपात पाठवले जातील.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा