Mumbai Flat Buy: तुम्ही देखील मुंबईमध्ये घर घेऊ शकता, म्हाडाचे दादर प्रोजेक्ट मधील घरे विक्रीला

Mumbai Flat Buy: मुंबईत घर घ्यायचे असेल तर मोठी रक्कम चुकवावी लागते लाखो रुपयांपासून ते करोडो रुपयांपर्यंत घरांच्या किमती वाढलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना घर घेण्यासाठी म्हाडा हा एक उत्तम पर्याय बनलेला आहे म्हणूनच म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असते आता देखील जर तुम्हाला मुंबईमध्ये घर घ्यायचे असेल तर तुम्ही दादर प्रोजेक्ट मधील घर घेऊ शकता. दादर मधील मागील दहा वर्षांपासून मागे पडलेला प्रोजेक्ट आता मार्गे लागण्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईमध्ये घर घेण्याची संधी Mumbai Flat Buy

दादाच्या गोखले रोड आणि रानडे रोड उघडली असलेली स्वामी समर्थ कृपा बिल्डिंग आणि R.K बिल्डिंग क्रमांक 1,2 चे भू-संपादन करण्याचा निर्णय म्हाडा मार्फत घेण्यात आला आहे. येथे आता म्हाडा कडून इमारत बांधण्यात येणार आहे आणि तेथील रहिवाशांना म्हाडा कडून फ्लॅट देण्यात येणार आहे परंतु सर्व रहिवाशांना फ्लॅट दिल्यानंतर देखील काही फ्लॅट चे विक्री म्हाडा करणार आहे ही विक्री लॉटरी पद्धतीने होऊ शकते.

म्हाडाचा हा प्रकल्प अर्धवट राहिलेला होता आणि त्यासाठी म्हाडा ने राज्य सरकारकडे भूसंपदाची परवानगी मागितली होती आता त्याला शासन निर्णय प्राप्त झाला आहे आणि लवकरच टेंडर काढून काम सुरू केले जाऊ शकते. ज्या ठिकाणी भूसंपादनाला किंवा इमारत बांधण्याला म्हाडाला विरोध होतो अशा ठिकाणी इमारत बांधण्याची कार्यक्रम दूर ढकलला जातो.

आता म्हाडा कडून टेंडर पद्धतीने या इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे आणि जो मालक किंवा बिल्डर काम अर्धवट टाकून निघून जाईल त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून समोर आले आहे.

हे पण वाचा: Drone Subsidy: शेतकऱ्यांनो आता ड्रोन ने फवारणी करा! सरकार ड्रोन खरेदीस देतंय भरभरून अनुदान

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा