Punjab Dakh: पंजाबरावांचा पुढील 5 दिवसांचा, 21 एप्रिल पर्यंतचा लेटेस्ट हवामान अंदाज, तुफान अवकाळी सावधान

Punjab Dakh Havaman Andaj: महाराष्ट्र मध्ये पंजाबराव हे एक ज्येष्ठ हवामान तज्ञ आहेत आणि त्यांचे अवकाळी विषयाचे हवामान अंदाज बऱ्याच वेळेस खरे ठरलेले आहेत मान्सून मध्ये कधी कधी वाऱ्यांच्या मोठ्या बदलावामुळे पावसामध्ये परिणाम होतो.

परंतु अवकाळी मध्ये शक्यतो असे वातावरणीयपरिणाम फारच कमी होतात त्यामुळे बऱ्याच वेळेस अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरतो आता आपल्या भारतीय हवामान खात्यामार्फत 15 एप्रिल ला हवामान अंदाज प्रस्तुत करण्यात आला होता त्यात यावर्षी मान्सून पाऊस चांगला असेल अशी माहिती देण्यात आली होती तसेच यावर्षीचा पावसाळा दिलासादायक असेल असे सांगण्यात आलेले होते.

महाराष्ट्र मध्ये आठ जून च्या सुमारास यावर्षी पावसाळा दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले परंतु आज पंजाबराव यांनी पुढील पाच दिवस म्हणजेच 21 एप्रिल पर्यंत कोण कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे याची माहिती दिली आहे आणि अवकाळी पावसाच्या या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Punjab dakh havaman andaj today

आता रब्बी सीजन चा विचार केला तर बऱ्याच शेतकऱ्यांचे गहू काढणी तसेच तूर काढणे हरभरा काढणे इत्यादी पिकांची काढणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु अद्याप देखील बरेच शेतकऱ्यांची पिके शेतामध्ये उभी आहेत आणि त्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

मागील महिन्यामध्ये महिन्याच्या अखेरीस बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला होता त्यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले आणि नंतर परत एप्रिल महिन्यामध्ये पण पाऊस पडला होता परंतु तो पाऊस फक्त विदर्भ पुरता मर्यादित होता आणि मराठवाडा तसेच इतर काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला होता.

परंतु आता हा पाऊस महाराष्ट्रात सर्वदूर असणार आहे आणि या विषयीचा आधीच एक अंदाज पंजाबराव यांनी 5 एप्रिलच्या सुमारास दिलेला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले होते की तुमचे हरभरा काढणी तसेच गहू काढणे कांदा काढणे लवकर उरकून घ्या कारण पुढे मोठा अवकाळी पाऊस येणार आहे आणि त्याचे पडसाद आता दिसत आहेत.

पुढील पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पाऊस पडेल परंतु त्यामध्ये मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी मधील जोराचा पाऊस पडू शकतो तसेच मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पण या पावसाचा परिणाम बघायला मिळेल.

मागील काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले होते आणि त्यामुळे मोठे नुकसान झाले आणि आता हा अवकाळी पाऊस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीकडे सरकलेला आहे पुढील पाच ते सहा दिवस संबंधित भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा