Punjab Dakh Havaman Andaj: पंजाब डख हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय हवामान तज्ञ आहेत त्यांचे अवकाळी विषयीचे हवामान अंदाज बऱ्याच वेळात खरे ठरलेले आहेत म्हणून शेतकऱ्यांचा त्यांच्या वरती विश्वास वाढला आहे. वेळोवेळी पंजाब डख यांच्याकडून हवामान अंदाज प्रसारित करण्यात येतो.
काही दिवसांपूर्वी पंजाबराव यांनी महाराष्ट्रात 29 मार्च पर्यंत चे हवामान कोरडे राहील असा अंदाज दिलेला होता आणि त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील हवामानामध्ये बदल बघायला मिळालेला आहे तसेच 29 मार्च नंतर महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवलेला होता.
नंतर गरज पडल्यास परत एक हवामान अंदाज देऊ असे पंजाबराव यांनी सांगितले होते आणि आता पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे यामध्ये त्यांनी पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस येणार असल्याची शक्यता वर्तवलेली आहे.
29 मार्च ते 31 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस, पंजाब डख
पुढील तीन दिवसांमध्ये म्हणजेच 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च चा हवामान अंदाज सांगताना त्यांनी सांगितले की सध्या हरभरा काढणी चालू आहे, कांदा काढणी चालू आहे, गहू काढणे चालू आहे, तसेच द्राक्ष बाग चालू आहे त्यामुळे खास करून अवकाळीसाठीचा हवामान अंदाज देण्यात येत आहे.
29 मार्च, 30 मार्च, आणि 31 मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस येणार आहे. हा पाऊस सर्व दूर पडणार नाही भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या.
29 मार्च ते 31 मार्च दरम्यान कोकण पट्टीमध्ये अवकाळी पाऊस येणार आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील दहा-बारा ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे हा पाऊस सर्व दूर नसणार त्यामुळे जास्त चिंता करू नका तसेच मध्य महाराष्ट्र देखील काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी अवकाळी पावसा विषयाचा हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे मराठवाड्यात मध्ये देखील काही भागांमध्ये पाऊस पडणार आहे हा पाऊस सर्व दूर नसेल म्हणजेच जिल्हा मधील दहा-बारा ठिकाणी पाऊस पडू शकतो
खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी अधिक काळजी घ्यायची आहे कारण संबंधित भागांमध्ये जास्त पाऊस पडणार आहे ज्यांची पिक काढणी चालू आहे त्यांनी संबंधित पिकांचे रक्षण करा.
सध्याचा हा 31 मार्च पर्यंतचा पाऊस महाराष्ट्रात सर्वदूर असणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचे पीक काढणे चालू आहे कांदा काढणे चालू आहे त्यांनी 5 मार्च च्या अगोदर संबंधित पीक काढण्याचे कामे पूर्ण करून घ्यावेत कारण पाच मार्च नंतर राज्यांमध्ये परत पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस महाराष्ट्रात आत्ताच्या पावसापेक्षा जास्त प्रमाणात पडू शकतो.
हे पण नक्की वाचा:
Monsoon 2024: यंदाच्या पावसाळ्यामध्ये किती पाऊस पडणार, हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांचा हवामान अंदाज
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा