महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप बऱ्याच ठिकाणी शाश्वत सिंचनाचे व्यवस्था उपलब्ध नाही म्हणजेच त्या गावांमध्ये मोठे नैसर्गिक तळे तलाव किंवा नदी तसेच इतर नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत नाही त्यामुळे संबंधित ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
पाण्याच्या या भीषण समस्येवरती उपाय म्हणून राज्य सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात त्यामधीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे शाश्वत सिंचन योजना. 2023-24 वर्षासाठी शाश्वत सिंचन योजनेसाठी आतापर्यंत 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता परत 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य मध्ये काही भागांमध्ये निर्धारित पातळीपेक्षा कमी पाऊस पडतो त्यामुळे संबंधित भागाला दुष्काळग्रस्त भागाचा दर्जा देण्यात येतो आणि अशा भागांमध्ये सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी शाश्वत सिंचन योजना राबवण्यात येते.
शेतकऱ्यांना त्यांची पिके घेण्यासाठी पाण्याची मदत व्हावी यासाठी सूक्ष्म सिंचन प्रणालीसाठी योग्य अनुदान, शेततळे बनवण्यासाठी अनुदान तसेच पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस साठी अनुदान प्रदान केले जाते जेणेकरून कमीत कमी पाण्यामध्ये चांगली शेती निर्माण केली जाऊ शकते.
लाभार्थ्यांची निवड करत असताना महाडीबीटीच्या वेबसाईटवरून अर्ज करावा लागेल आणि संबंधित व्यवसाय वरूनच लाभार्थ्यांची निवड तसेच पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आधार संलग्न बँक खात्यामध्ये जर लाभार्थ्यांचे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली तर अनुदानाची राशी वितरित केली जाते.
डायरेक्ट ऑनलाइन पद्धतीने प्रोसेस असल्यामुळे आणि खात्यावरती डायरेक्ट पैसे येत असल्यामुळे संबंधित योजनेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आला आहे.
शासनाकडून 50 कोटी अतिरिक्त वितरणाचा अधिकृत जीआर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे तसेच संबंधित योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी तुम्हीवितरणाचा अधिकृत जीआर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे तसेच संबंधित योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय कृषी विकास योजना चे मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे.
हे पण वाचा:
- सोलर पंप दर, सोलर पंपाच्या विक्रेत्यांची यादी आणि सोलर विक्रेत्यांचे मोबाईल नंबर तसेच ईमेल ऍड्रेस चेक करा
- Solar yojana: सोलर योजनेचा अर्ज मंजूर झालाय का, असे चेक करा
- पुढच्या दोन महिन्यांमध्ये कापसाला काय रेट मिळणार, तज्ञांनी दिली मोठी अपडेट
शासनाचा 28 मार्च अधिकृत जीआर बघा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा