PM Surya Ghar Yojana: केंद्र शासनाकडून सर्वांना मोफत वीज देण्यात यावी यासाठी पीएम सूर्य घर योजना राबवण्यात येत आहे. 13 फेब्रुवारी रोजी या योजनेचे घोषणा करण्यात आली आणि या योजनेचा चांगला प्रचार प्रसार देखील झाला.
ज्या व्यक्तींना स्वतःच्या घरावरती सोलर बसवायचे आहे अशा व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले. या आधी देखील एक सोलर योजना कार्यरत होती जी म्हणजे रूप टॉप सोलर योजना. परंतु या योजनेमध्ये लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता जास्त कोटेशन ची रक्कम, सोलर साठी वेंडरची निवड इत्यादी.
आणि आता या नवीन योजनेमध्ये देखील महावितरण कडून अर्जदारांना एक मोठा धक्का देण्यात आलेला आहे तो म्हणजे या योजनेसाठी परत एकदा अर्ज करावा लागू शकतो. यापूर्वीच्या रूफ टॉप सोलर योजनेसाठी पण सेंट्रलाइज पोर्टल तयार करण्यात आले होते आणि त्यावरती अर्ज करावे लागत होते.
महत्वाचे मुद्दे:
- घरावरील सोलर लाभार्थ्यांना परत अर्ज करावा लागेल
- ज्यांनी सेंट्रलाइज पोर्टलवरून अर्ज केला आहे त्यांना काहीसा अडचणीचा सामना करावा लागेल
- संबंधित सोलर अर्ज हा महावितरणाच्या आई स्मार्ट पोर्टल वरती करावा लागेल
- अर्ज कुठे करायचा, उपाययोजना आणि फायदे तोटे याविषयीचे अधिक माहिती या लेखात आहे
Surya Ghar Solar Yojana:घरावरील सोलर साठी परत अर्ज करावा लागेल
आत्ताच्या पीएम सूर्य घर योजनेमध्ये देखील एक सेंट्रलाइज पोर्टल तयार करण्यात आलेले आहे आणि त्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे परंतु ज्या लाभार्थ्यांनी संबंधित पोर्टलवरून अर्ज दाखल केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना टेम्पररी टोकन देऊन परत महावितरणच्या वेबसाईटवरून अर्ज करण्यास सांगण्यात येत आहे.
म्हणजे संबंधित लाभार्थ्यांना परत महावितरणाच्या वेबसाईट वरती नोंदणी करावी लागेल. टोकन भरावे लागेल आणि नंतर महावितरणाच्या परवानगी नंतरच त्यांना पीएम सूर्य घर योजनेचा म्हणजे सोलार योजनेचा लाभ मिळेल. (हे वाचा::आता या जिल्ह्यात 10 गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री सुरू, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय)
महावितरणाच्या वेबसाईटवर सोलर योजना नोंदणी
म्हणजे ज्यांनी आता सेंट्रलाईज पोर्टलवरून नोंदणी केलेली आहे अशा व्यक्तींना परत नोंदी करावीच लागेल आणि पुढील काही दिवसांमध्ये परत एकदा मेसेज येण्यास सुरुवात होईल. म्हणजेच ज्या लाभार्थ्यांचे अर्ज सेंटरलाईज पोर्टल वरती मंजूर झाले त्यांना महावितरणाच्या आय स्मार्ट पोर्टल वरती परत नोंदणी करावी लागेल.
महावितरणाच्या पोर्टलवरील पुढील नोंदणी नंतर तुम्हाला वेंडर निवडावा लागेल नंतर सोलर पॅनलचे इन्स्टॉलेशन करावे लागेल संपूर्ण सोलर पॅनल इंस्टॉलेशन केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्गीत केली जातील.
प्रति किलोवॅट जास्तीत जास्त 30 हजार रुपये रक्कम तुम्हाला दिली जाईल. एकंदरीत सांगायचे झाले तर सेंट्रलाइज पोर्टल वरील लाभार्थ्यांना परत महावितरणाकडे https://css.mahadiscom.in/UI/ROOFTOP/PVNewApplication.aspx या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल त्यामुळे अनेक लाभार्थी संबंधित योजनेपासून वगळले जातील.
सोलर अर्ज मंजूर झालाय का? चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा