आपल्याला माहीतच असेल की कोणतेही बँक किंवा वित्तीय संस्था लोन देण्यापूर्वी आपली क्रेडिट हिस्टरी तपासत असते आणि त्याच बरोबर आपला सिबिल स्कोर तपासत असते सिबिल स्कोर म्हणजे आपल्या आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखाच आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
आणि म्हणूनच बँक सिबिल स्कोर च्या आधारे लोन देत असतात आणि जेव्हा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त नसेल तेव्हा बँक शक्यतो लोन देणे टाळतात आणि जरी लोन दिले तरी त्यावरती जास्त व्याजाचे आकारणी करतात आणि त्यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते
म्हणूनच जर तुमचा cibil score कमी असेल तर तुमच्यासाठी आजच्या या लेखामध्ये मी पाच टिप्स सांगितलेले आहेत ज्यांचा उपयोग करून तुम्ही पण तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त वरती नेऊ शकाल.
महत्त्वाचे मुद्दे:
- कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर महत्त्वाचा
- 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल तर लवकर कर्ज मिळते
- कमी cibil score मुळे जास्त व्याजदर द्यावा लागू शकतो
- सिबिल स्कोर वाढवण्यासाठी काही टिप्स असतात त्यांची माहिती
सिबिल स्कोर वाढवण्यासाठी टिप्स
कर्जाचे हप्ते वेळेत भरा
जर तुम्ही आता कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले असेल तर त्या कर्जाचे हप्ते वेळेत भरा जर तुम्ही कर्जाचे हफ्ते वेळेमध्ये भरले नाही तर त्याचा सिबिल स्कोर वरती मोठा परिणाम होतो आणि तुमची क्रेडिट हिस्टरी खराब होते परिणामी तुमचा क्रेडिट स्कोर कमी होईल आणि जर तुम्हाला भविष्यामध्ये कर्ज घेण्याची गरज पडली तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही. जर कर्जाचे हप्ते भरणे तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही बँकेमार्फत ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टीम लावू शकतात जेणेकरून तुमच्या कर्जाचा हप्ता वेळेत भरला जाईल.
सर्व कर्ज फेडा
सर्व प्रकारचे कर्ज हे कर्ज घेताना निर्धारित केलेल्या टाईम लाईन मध्येच फेडा जर कर्ज फेडण्यास उशीर झाला तरी पण त्याची नोंद क्रेडिट स्कोर मध्ये होते आणि सिबिल स्कोर कमी होतो. यामुळे जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त वरती वाढवायचा असेल तर तुम्हाला तुमचे सर्व कर्ज फेडणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्यासाठी तुमच्या कर्जाचा योग्य पद्धतीने वापर करा आणि वेळेमध्ये कर्ज परतफेड करा.
क्रेडिट कार्डचा उपयोग मर्यादित करा
क्रेडिट कार्डचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर त्यामुळे आपला सिबिल स्कोर वाढवू शकतो परंतु जर क्रेडिट कार्ड आपण चांगले वापरले नाही तर त्याचा मोठा परिणाम सिबिल स्कोर वरती होईल आणि म्हणूनच क्रेडिट कार्ड मधून एकूण लिमिटच्या 30% च्या वरती रक्कम खर्च करू नका आणि क्रेडिट कार्ड मधून तेवढेच रक्कम घ्या जे तुम्ही वेळेचे परतफेड करू शकाल जर तुम्ही क्रेडिट कार्डचा जास्त उपयोग केला आणि निर्धारित लिमिट पर्यंतचे सर्व पैसे वापरले तर असा सिग्नल जाऊ शकतो की तुमचे उत्पन्न व्यवस्थित नाही आणि तुम्हाला क्रेडिट कार्डची गरज पडत आहे आणि अशा परिस्थितीत सिबिल स्कोर नक्कीच खराब होतो.
विविध प्रकारचे कर्ज घ्या
फक्त एकच प्रकारचे कर्ज घेऊ नका विविध प्रकारचे कर्ज घ्या म्हणजेच ग्रह कर्ज, वैयक्तिक कर्ज तसेच इतर प्रकारचे कर्ज घ्या. जर तुम्ही कर्जच घेतले नाही तर तुम्हाला सिबिल स्कोर नसेल. म्हणजेच सिबिल स्कोर वाढवण्यासाठी सुरक्षित तसेच काहीसे असुरक्षित कर्ज बँक कडून घेणे आवश्यक असते.
क्रेडिट रिपोर्ट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर वेळीच रिपोर्ट करा
कधी कधी आपल्याकडे रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आपण त्याकडे छोटीशी चूक म्हणून दुर्लक्ष करू शकतो परंतु जेव्हा पण क्रेडिट रिपोर्ट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याची वेळीच रिपोर्ट करा जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर मेंटेन राहील. तसेच वेळोवेळी तुमचा सिबिल स्कोर चेक करत रहा जेणेकरून मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला वेळेत समजेल.
आणि हे पण लक्षात असू द्या की वरील सर्व टिप्स चा वापर केला तरी सिबिल स्कोर वाढण्यासाठी सहा महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. त्यामुळेच तुमचा सिबिल स्कोर वाढवायचा असेल तर वेळोवेळी कर्जाच्या आणि त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करा तसेच कर्जाची परतफेड आणि कर्जाचे हप्ते वेळेत भरत रहा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा