उन्हाळी पिक पाहणीचे अर्ज सुरू, आत्ताच अर्ज करा नाहीतर शासनाच्या योजनांचा लाभ भेटणार नाही

जे शेतकरी उन्हाळी ई पीक पाहणीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता सरकारकडून उन्हाळी पिक पाहनी चालू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक ॲप अद्यावत करून प्लेस्टोर वरती टाकण्यात आलेले आहे.

जर तुम्हाला देखील संबंधित पिक पाहणी मध्ये आपल्या शेतातील पिकांची माहिती नोंदवायची असेल तर तुम्ही संबंधित ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी करू शकतात. पिक पाहणी ॲप ची लिंक आम्ही खाली दिलेलीच आहे.

उन्हाळी ई पिक पाहणी

सध्या खरीप हंगाम तसेच रब्बी हंगाम ची पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता उन्हाळी ई पीक पाहणी प्रक्रिया सुरू झालेले आहे आणि त्याच अनुषंगाने मागील हंगामामध्ये केंद्रशासनाच्या वतीने क्रॉप सर्वे अप्लिकेशनच्या मदतीने पीक पाहणी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

पहिल्यांदा काही गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावरती क्रॉप सर्व ॲप्लीकेशनच्या मदतीने ई पीक पाहणी साठी परवानगी देण्यात आलेली होती आणि आता महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने पीक पाहणी करता येऊ शकते.

मागील ई पीक पाहनी एप्लीकेशन मध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी होत्या आणि शेतकऱ्यांना पिकांचे फोटो नीट अपलोड करता येत नव्हते तसेच तांत्रिक बिघाडामुळे डाटा सबमिट होत नव्हता म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी पासून वंचित रहावे लागले होते परंतु आता शासनाकडून 13 एप्रिल 2024 रोजी संबंधित ॲप चे नवीन वर्जन लॉन्च करण्यात आलेले आहे.

या 3.0 व्हर्जन नुसार आधीच्या तांत्रिक बिघाडामध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सुरळीतपणे ई पीक पाहणी अर्ज भरता येऊ शकतील. जर तुमच्याकडे या आधीचे ई पीक पाहणीचे एप्लीकेशन असेल तर ते आत्ताच अपडेट करून घ्या किंवा सुधारित एप्लीकेशन डाऊनलोड करून घ्या.

सुधारित एप्लीकेशन साठी तुम्ही प्ले स्टोर वरती e pik pahani app 2024 असे सर्च केल्यानंतर भेटेल किंवा संबंधित ॲपचे डायरेक्ट लिंक आम्ही खाली दिलेली आहे ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. उन्हाळी ई पीक पाहणी करत असताना तुमच्या गाव डिजिटल क्रॉप सर्वेसाठी निवडलेले आहे का याची पण माहिती करून घ्या.

उन्हाळी पीक पाहणी कशी करावी

  • सर्वात प्रथम प्लेस्टोर वरून ई पीक पाहणी एपकेशन डाउनलोड करून घ्या
  • ह्या एप्लीकेशनचे जवळपास 50 लाख डाउनलोड आहेत आणि आता सध्या 13 एप्रिल रोजी सुधारित वर्जन अपडेट करण्यात आलेले आहे
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुमच्याकडून काही परमिशन मागितले जातील जसे की लोकेशन, कॅमेरा इत्यादी त्यांना Allow करा
  • आता तुमच्यापुढे एकच स्क्रीन उघडेल ज्यामध्ये तुम्हाला उजवीकडे स्क्रोल करायचे आहे आणि दोन वेळा स्क्रीन उजवीकडे लोटली तर तुमचे महसूल क्षेत्र निवडण्याचा पर्याय येईल ज्यामधून तुमचे योग्य महसूल क्षेत्र निवडायचे आहे.
  • शेतकरी म्हणून लॉगिन करा विकल्प वरती क्लिक करा
  • मोबाईल नंबर टाकण्याचा विकल्प येईल त्यामध्ये मोबाईल नंबर टाका आणि पुढे जा वरती क्लिक करा
  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर खातेदाराचे नाव असा पर्याय मिळेल यावरती क्लिक करून आपले नाव असल्याचे पुष्टी करा
  • खातेदाराच्या नावाच्या खाली चार अंकी सांकेतांक क्रमांक टाकावा लागेल तो व्यवस्थित टाका आणि जर तो तुमच्या लक्षात नसेल तर संकेतांक विसरलात वरती क्लिक करा तुमच्या पुढे तुमचा संकेतांक येईल.
  • तुमचे पिक पाहणी ॲप आता उघडलेले आहे त्यामध्ये पीक नोंदणी विकल्प अंतर्गत पिकाची माहिती क्षेत्र तसेच इतर उपयुक्त माहिती भरा आणि पुढे जा वरती क्लिक करून संबंधित माहिती सबमिट करा
  • वरील सर्व स्टेप्स चा अवलंब करून तुम्ही उन्हाळी ई पीक पाहणी अर्ज भरू शकता.

उन्हाळी ई पीक पाहणी ॲप लिंक

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा