Rain update: एप्रिल महिन्यामध्ये परत वादळी अवकाळी चे संकट, या तारखेपासून अवकाळी पाऊस सुरू

Rain Update 2024 Maharashtra: महाराष्ट्र मध्ये 29 मार्चपासून अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आलेला होता आणि त्यानुसार नगर तसेच नाशिकचा काही भाग आणि विदर्भ तसेच इतर काही भागांमध्ये पाऊस पडलेला बघायला मिळाला.

काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस बघायला मिळाला आणि महाराष्ट्रात सध्या बऱ्याच ठिकाणी पिकांची काढणी चालू आहे कांदा काढणे चालू आहे हरभरा तसेच द्राक्ष काढणे चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होते.

एका बाजूला काही शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना दुसऱ्या बाजूला उष्णतेचा तडाखा वाढलेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी आता बी बियाणे पेरलेले आहे पीक अजून लहान आहे असे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे कारण नदी, नाले विहिरींचे पाणी खूपच कमी झालेले आहे.

आता या उष्णतेच्या तडाख्यात काही शेतकऱ्यांना दिलासादायक तर काही शेतकऱ्यांना चिंता वाढवणारी बातमी आहे कारण एप्रिल महिन्यामध्ये परत अवकाळी पावसाचे संकट ओढवणार आहे. 5 एप्रिल नंतर संबंधित पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात अवकाळी चा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे एप्रिल महिन्यामध्ये परत विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहू शकते.

आता हा 31 मार्चपर्यंतचा पाऊस काही निर्धारित भागांमध्ये आणि कमी स्वरूपात होता परंतु एप्रिल महिन्यामधील पावसाचे स्वरूप हे जास्त व्यापक आणि महाराष्ट्रात सर्व दूर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एक मार्च ते पाच मार्च दरम्यान महाराष्ट्र मध्ये पावसाची शक्यता कमी आहे परंतु देश पातळीवर विचार केला तर पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा पारंपारच वाढलेला आहे बऱ्याच ठिकाणी 40°c च्या वरती तापमान गेलेलं आहे आणि उन्हाचा तडाखा वाढत आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तापमानात मोठी वाढ झालेली आहे आणि राज्यात धरणांचा पाणीसाठा कमी झालेला आहे त्यामुळे पाणी संकट निर्माण होत आहे.

पंजाब डख खासदारकीच्या निवडणुकीला उभे, हा आहे मतदारसंघ

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा