उपविभागीय अधिकारी म्हणजे काय: राज्याच्या महसूल विभागामध्ये उपविभागीय अधिकारी हे महत्त्वपूर्ण पद आहे. उपविभागीय अधिकारी हे राजपत्रिय दर्जा एकचे पद आहे म्हणजेच क्लास वन ऑफिसर चे पद आहे. जिल्ह्यामधील प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी मदत करतात.
भारतीय प्रशासकीय कार्य प्रणालीमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे आपण बऱ्याच वेळेस टीव्ही किंवा न्यूज पेपर मध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांचे इंटरव्यू बघतो किंवा काही व्यक्ती उपविभागीय अधिकारी झाल्याचे ऐकतो त्यामुळे आपल्या मनात प्रश्न पडू शकतो की उपविभागीय अधिकारी म्हणजे नेमके कोण.
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यक्षेत्र Sub Divisional Officer
उपविभागीय अधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील प्रांतामध्ये काम करत असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रांत किंवा उपविभाग हे अनेक असतात आणि प्रत्येक उपविभागांमध्ये अनेक तालुके असतात. उपविभाग हा एक प्रशासकीय कार्यभाग असतो.
उपविभागीय अधिकारी हे निवडणूक प्रशासन, महसूल प्रशासन, न्याय प्रशासन आणि अतिरिक्त प्रशासन हे मुख्य कार्यक्षेत्र आहे.
निवडणूक प्रशासन
जेव्हा उपविभागामध्ये निवडणुका होतात तेव्हा त्याचे प्रमुख म्हणून उपविभागीय अधिकारी कार्य करत असतात त्यांच्या वरती निवडणुकांची तयारी, निवडणुका घेणे आणि त्यानंतर निवडणुकांच्या निकालाची जबाबदारी सोपवलेली असते निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी मदत करत असतात.
महसूल प्रशासन
महसूल प्रशासन हे उपविभागीय अधिकाऱ्यांचे मुख्य कार्यक्षेत्र आहे कारण यामध्ये त्यांच्यावरती महसूल विभागाच्या काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात. उपविभागीय अधिकारी हे महसूल संकलन, ग्रामपंचायतींना मार्गदर्शन, जमीन वसुली तसेच विविध सरकारी योजना राबवण्यामध्ये प्रशासनाची मदत करतात.
न्याय प्रशासन
न्याय प्रशासनामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये न्याय प्रशासन मदत करते तसेच न्याय प्रशासन दंडाधिकारी म्हणून कार्य करतात. जे व्यक्ती उपविभागीय कार्यक्षेत्र मध्ये कायद्याचे उल्लंघन करतात त्यांना सजा करण्याचे काम उपविभागीय अधिकारी करतात.
अतिरिक्त प्रशासन
जेव्हा सरकारकडून काही योजना येतात तेव्हा त्यांची माहिती ग्रामपंचायत तालुकास्तरावरती देऊन जनजागृती करण्यासाठी उपविभागीय अधिकारी मोलाची भूमिका पार पाडतात. प्रशासनामध्ये अधिक चांगला बदल घडवून आणणे आणि लोकांचे प्रश्न सोडवणे हे उपविभागीय अधिकारी करत असतात.
उपविभागीय अधिकाऱ्यांची निवड कशी होते
उपविभागीय अधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्रीय लोकसेवा आयोगातून म्हणजेच एमपीएससी मधून केली जाते. जे उमेदवार प्रिलीम आणि मेन्स एक्झाम क्लिअर करतात त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाते आणि त्यानंतर जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुमची उपविभागीय अधिकारी म्हणून निवड केली जाऊ शकते.
उपविभागीय अधिकारी हे भारतीय प्रशासनातील एक महत्त्वाची कडी आहेत. उपविभागीय अधिकारी हे विविध शासनाचे निर्णय तालुकास्तरावरती आणि ग्रामीण स्तरावरती पोहोचत असतात आणि प्रशासन राखण्यामध्ये सरकारची मदत करत असतात.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा